अमरावती (प्रतिनिधी), ७ ऑगस्ट २०२५ –
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार गट) चे तरुण आणि अभ्यासू आमदार रोहित दादा पवार यांचा अमरावती दौरा ठरतोय विद्यार्थ्यांसाठी एक अनमोल संधी. शुक्रवार, दिनांक ८ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी १२ वाजता ते दुपारी ४:४५ या वेळेत, संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन, अमरावती येथे ते UPSC आणि MPSC परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधणार आहेत.
विद्यार्थ्यांच्या समस्या, अडचणी, अभ्यासातील अडथळे आणि स्पर्धा परीक्षांसंबंधी दिशा व मार्गदर्शन यावर उघडपणे चर्चा करण्याचा उद्देश या संवाद सत्रामागे आहे. यामुळे स्पर्धा परीक्षा देणाऱ्या युवकांना राजकीय प्रतिनिधींशी थेट बोलण्याची आणि आपल्या समस्या मांडण्याची संधी मिळणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) च्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी सर्व विद्यार्थी, युवक आणि युवतींना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. अमरावती विभागातील तरुणांसाठी ही एक प्रेरणादायी आणि मार्गदर्शक संधी ठरणार आहे.
