श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांचे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन
सह्याद्री माझा न्युज l प्रतिनिधी

वंचित बहुजन आघाडीच्या वतीने शनिवारी अमरावती जिल्ह्यातील पंचफ्लोरा मंगल कार्यालय, चांदूरबाजार रोड येथे भव्य संवाद बैठकीचे आयोजन करण्यात आले. या बैठकीचे आयोजन पूर्व जिल्हाध्यक्ष राहुल मेश्राम आणि पश्चिम जिल्हाध्यक्ष संजय चौरपगार यांनी केले होते.
या बैठकीत वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी आगामी निवडणुका, पक्षाचे ध्येयधोरणे आणि संघटनेची भूमिका याबाबत सविस्तर माहिती दिली. त्यांच्या मार्गदर्शनामुळे कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले.

अमरावती जिल्ह्यातील सर्व १४ तालुक्यांमधून प्रत्येक गावातून ३० ते ४० प्रमुख कार्यकर्त्यांनी या बैठकीला हजेरी लावली. पावसाच्या प्रतिकूल हवामानातही मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून पक्षाबद्दलची निष्ठा व बांधिलकी दर्शवली.
या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून निलेश भाऊ विश्वकर्मा (प्रदेशाध्यक्ष, युवक आघाडी) उपस्थित होते. यावेळी अमरावती जिल्हा निरीक्षक प्रा. डॉ. धैर्यवर्धन पुंडकर, पूर्व जिल्हाध्यक्ष राहुल मेश्राम, पश्चिम जिल्हाध्यक्ष संजय चौरपगार, पूर्व युवक आघाडी अध्यक्षा प्राजक्ता ताई पिल्लेवार, महासचिव अशोक भाऊ नवलकर, महासचिव साहेबराव वाकपांजर, कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष विनय बांबोडे, युवक जिल्हाध्यक्ष अंकुश वाकपांजर यांच्यासह जिल्ह्यातील १४ तालुक्यांचे तालुकाप्रमुख उपस्थित होते.
मोठ्या संख्येने आजी-माजी पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांच्या उपस्थितीत ही संवाद बैठक उत्साहात व यशस्वीरित्या पार पडली.