जाणून घ्या तुमचा दिवस कसा असेल आणि कोणत्या क्षेत्रात मिळेल यश
मेष (Aries)
आजचा दिवस तुमच्या प्रगतीसाठी अनुकूल आहे. नोकरीत वरिष्ठांकडून कौतुक मिळेल आणि नव्या जबाबदाऱ्या सांभाळण्याची संधी मिळेल. व्यवसायिकांना नवीन भागीदारी किंवा करार होण्याची शक्यता आहे. आर्थिकदृष्ट्या स्थैर्य राहील. कुटुंबातील वातावरण आनंददायी असेल. आरोग्याच्या दृष्टीने पचनसंस्थेशी संबंधित लहान त्रास संभवतो, त्यामुळे आहाराकडे लक्ष द्या.
उपाय : दिवसाची सुरुवात लाल फुलाचे दर्शन घेऊन करा.
वृषभ (Taurus)
आत्मविश्वास उंचावलेला राहील. अनेक दिवसांपासून अपूर्ण राहिलेलं काम आज पूर्ण होईल. आर्थिक बाबतीत पैशाची आवक होईल पण खर्चही वाढतील. कौटुंबिक वातावरणात तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. प्रवास करताना आणि वाहन चालवताना विशेष काळजी घ्या.
उपाय : आईला पांढऱ्या रंगाचे वस्त्र भेट द्या.
मिथुन (Gemini)
आज नवीन योजना राबविण्यासाठी शुभ दिवस आहे. विद्यार्थ्यांना अभ्यासात अपेक्षित यश मिळेल. मित्रांकडून सहकार्य लाभेल. भावंडांशी नात्यात जवळीक वाढेल. प्रेमसंबंधातील तणाव कमी होईल. करिअरमध्ये एखादी नवी संधी मिळण्याचे योग आहेत.
उपाय : वडिलांचा आशीर्वाद घेऊन दिवसाची सुरुवात करा.
कर्क (Cancer)
आज तुम्ही थोडेसे भावनिक होऊ शकता. निर्णय घेताना मोठ्यांचा सल्ला घ्यावा, तो फायदेशीर ठरेल. व्यवसायिकांना अपेक्षित लाभ मिळेल. कुटुंबात एखाद्या धार्मिक कार्याचा योग आहे. आरोग्य उत्तम राहील. मानसिक शांततेसाठी ध्यानधारणा उपयुक्त ठरेल.
उपाय : पाण्यात थोडं दूध मिसळून झाडांना अर्पण करा.
सिंह (Leo)
नेतृत्वगुणांना वाव मिळेल. समाजात मान-सन्मान वाढेल. नोकरीत पदोन्नतीची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना परदेशातील उच्च शिक्षणाच्या संधी उपलब्ध होऊ शकतात. प्रवासाचे योग आहेत आणि तो प्रवास लाभदायक ठरेल. आरोग्य चांगले राहील.
उपाय : सकाळी सूर्यदेवाला लाल फुल अर्पण करा.
कन्या (Virgo)
आर्थिक व्यवहारात विचारपूर्वक निर्णय घ्या. नोकरीत वरिष्ठांशी गैरसमज निर्माण होऊ शकतात, त्यामुळे शब्दांचा वापर जपून करा. मानसिक तणाव जाणवेल पण संध्याकाळनंतर परिस्थितीत सुधारणा होईल. प्रेमसंबंध गोड होतील. आरोग्याबाबत थोडी थकवा जाणवेल.
उपाय : गरजू व्यक्तींना हरित धान्य दान करा.
तुला (Libra)
भाग्याची साथ लाभेल. लांब प्रलंबित कामे आज पूर्ण होतील. आर्थिक लाभाचे योग आहेत. मालमत्ता खरेदी-विक्रीसाठी अनुकूल वेळ आहे. वैवाहिक जीवन आनंदी राहील. सामाजिक सन्मानात वाढ होईल.
उपाय : देवीला गुलाबाचे फुल अर्पण करा.
वृश्चिक (Scorpio)
अनपेक्षित खर्चाचा भार जाणवू शकतो. नोकरीत जबाबदारीची कामे हाताळावी लागतील. मित्रांकडून सहकार्य मिळेल. आरोग्याच्या दृष्टीने तणाव टाळा. कुटुंबात थोडासा मतभेद संभवतो पण संयम ठेवल्यास परिस्थिती सुधारेल.
उपाय : पाणीदार फळांचे दान करा.
धनु (Sagittarius)
आज तुमच्या परिश्रमाला योग्य फळ मिळेल. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेत यश लाभेल. व्यावसायिकांना नवे करार मिळतील. प्रवासाचा आनंद घेता येईल. कुटुंबात सौख्य आणि समाधान राहील. आरोग्य सुधारेल.
उपाय : गुरुवारी पिवळा वस्त्र दान करा.
मकर (Capricorn)
कार्यक्षेत्रात मेहनतीला योग्य मान्यता मिळेल. वरिष्ठ तुमच्यावर प्रसन्न राहतील. आर्थिक स्थितीत हळूहळू सुधारणा होईल. कुटुंबातील जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतील. आरोग्य चांगले राहील.
उपाय : शनी मंदिरात काळे तीळ दान करा.
कुंभ (Aquarius)
आजचा दिवस प्रगतीकारक आहे. जुने मित्र किंवा ओळखीचे लोक मदतीस येतील. आर्थिकदृष्ट्या नवीन उत्पन्नाचे स्त्रोत उभे राहतील. वैवाहिक जीवन गोड राहील. आरोग्य उत्तम. धार्मिक कार्यात सहभाग लाभेल.
उपाय : गरजू लोकांना पाणी पाजण्याची व्यवस्था करा.
मीन (Pisces)
आज नवीन योजना तयार होतील. नोकरीत बदल अथवा नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक बाबतीत लाभाचे योग आहेत. प्रेमसंबंध दृढ होतील. परदेशातून शुभ वार्ता येऊ शकते. आरोग्य सुधारेल.
उपाय : विष्णू मंदिरात पिवळे फुल अर्पण करा.
