(ता. देवरी, जि. गोंदिया) – प्रतिनिधी
बघी देव गावातील जिल्हा परिषद शाळा ‘PM श्री Z.P.P. मॉडेल स्कूल’ ही नावाने मॉडेल असली तरी सुविधांच्या बाबतीत मात्र दुर्दैवाने मागेच पडली आहे. या शाळेसमोरील जेवणासाठी वापरला जाणारा मंडप अनेक महिन्यांपूर्वी कोसळून पडलेला आहे. परंतु आजतागायत या मंडपाची दुरुस्ती करण्यात आलेली नाही. त्यामुळे दररोज चिमुकले विद्यार्थ्यांना उघड्यावर बसून अन्नग्रहण करावे लागत आहे.सध्या सुरू असलेल्या पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर ही स्थिती अत्यंत गंभीर आहे. ना विद्यार्थ्यांना सुरक्षित जागा, ना योग्य आसनव्यवस्था – अशा परिस्थितीत मुलांचे आरोग्यही धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
