प्रतिनिधी:

दर्यापूर काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. माजी काँग्रेस अध्यक्ष दिवंगत जिक्करभाई घाणीवाले यांचे सुपुत्र, तसेच माजी नगरपरिषद उपाध्यक्षा जुबेदा बाई घाणीवाले यांचे सुपुत्र उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते सलीम जिक्करभाई घाणीवाले यांनी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला आहे.हा पक्षप्रवेश समारंभ महसूल मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी भाजपचे अनेक मान्यवर उपस्थित होते.

भाजपात प्रवेश का?
सलीमभाईंनी सांगितले की –“शहराच्या विकासासाठी व मुस्लिम समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी मी भाजपात प्रवेश केला आहे.सबका साथ, सबका विकास या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विचारांवर माझा विश्वास असून, जातीपातीचे राजकारण न करता विकासाला प्राधान्य देणार आहे.आगामी निवडणुकांमध्ये भाजप उमेदवारांना विजयी करण्यासाठी मी पूर्ण ताकदीनिशी उभा राहीन.”
उपस्थित मान्यवर
या पक्षप्रवेश सोहळ्यात खासदार (राज्यसभा) अनिल बोंडे, माजी खासदार रामदास तडस, आमदार उमेश यावलकर, आमदार राजेश वानखडे, माजी आमदार रमेश बुंदिले, अमरावती भाजप जिल्हाध्यक्ष रविराज देशमुख, छायाताई दंडाळे, दिनेश सूर्यवंशी, जयंत डेहनकर यांच्यासह भाजपचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.उद्योजकतेची भरीव कामगिरीसलीम घाणीवाले हे दर्यापूर शहरातील प्रसिद्ध उद्योजक असून त्यांनी उद्योग क्षेत्रात भरीव कामगिरी केली आहे. त्यांच्या भाजप प्रवेशामुळे स्थानिक राजकारणात मोठी चर्चा रंगली आहे. काँग्रेसला याचा मोठा फटका बसणार असून दर्यापूर तालुक्यात भाजपला मुस्लिम समाजाचा पाठिंबा वाढेल, असे नागरिकांचे मत आहे.