सह्याद्री माझा न्युज नेटवर्क
दर्यापूर तालुक्यातील येवदा गावात देशमुख नावाचा वरली वाला गेल्या अनेक महिन्यांपासून उघडपणे वरली (जुगार) चालवतोय. दिवसरात्र चालणाऱ्या या धंद्यामुळे गावातील तरुणाई बरबाद होत आहे. अनेक शेतकरी घरचा पैसा गमावून कर्जबाजारी झाले आहेत. काही जण कुटुंबाकडून दुरावले, तर काहींची शेती गहाण ठेवण्याची वेळ आली.
गावकऱ्यांचा आरोप आहे की हा धंदा हप्त्याच्या जोरावर चालतो. फक्त खालच्या पातळीवर नाही, तर स्थानिक ठाणेदारांपासून पोलीस कर्मचारी, महसूल विभागातील काही घटक आणि स्थानिक दादागिरी करणारे गुंड यांच्यापर्यंत हप्ते पोहोचतात.
म्हणूनच वरलीचे अड्डे तोडायचे नाव प्रशासन घेत नाही, असे उघड आरोप गावकरी करत आहेत.
गावकऱ्यांचा रोष :
“वरलीवाल्याला ठाणेदारांचा थेट पाठींबा आहे. आम्ही तक्रार केली तरी फाईलवर धूळ जमा होते.”
“आमच्या तरुण पिढीला जुगाराने संपवलं. पण प्रशासन मूकबधिर झालंय.”
“वरलीवाल्याने गावचं वातावरण अस्वस्थ केलं. दिवसभर जुगार खेळणारे टोळके दिसतात.”
कायद्याचे रक्षकच जेव्हा भक्षक बनतात…
गावकऱ्यांचा ठाम आरोप आहे की कायद्याचे रक्षक ठरवले गेलेले पोलीसच जेव्हा हप्त्याच्या मोहजालात अडकतात, तेव्हा सामान्य माणसाला न्याय कुठून मिळणार? जुगार, दारू, हप्ते या त्रिकोणात गाव पोखरलं जातंय.
प्रशासन खरंच आळा घालेल का?
या संपूर्ण प्रकरणाकडे वरिष्ठ पोलीस अधिकारी, जिल्हा प्रशासन आणि राज्य सरकार लक्ष देणार की नाही, हा मोठा प्रश्न आहे. ग्रामस्थांमध्ये संताप इतका वाढला आहे की जर कारवाई लवकर झाली नाही तर गावकरी स्वतःच आंदोलनाचा मार्ग स्वीकारतील.
आता पाहावं लागणार आहे की ‘वरली माफिया’ वाचतो का तुरुंगाच्या लोखंडी गजांआड जातो.
